जाहिराती

शासनाच्या भरती प्रक्रियेतील सर्वात महत्वाची पायरी म्हणजे जाहिरात. जाहिरात म्हणजे ज्या पदांची भरती करावयाची आहे त्या बद्दल ची विस्तृत माहिती. हि माहिती अत्यंत लक्षपूर्वक वाचणे गरजेचे आहे. या मध्ये संबंधित पदाची भरती करावयाची संख्या, भरती प्रक्रियेची रचना, शैक्षणिक पात्रता, महत्वाच्या अटी अश्या प्रकारची महत्वाची माहिती असते याकडे दुर्लक्ष करु नये. नीट काळजी पूर्वक वाचून मगच फॉर्म भरवा.

mahajobs jahirati advertisement
mahajobs admit cards

प्रवेशपत्र

प्रवेशपत्र हे अत्यंत महत्वाचे आहे या च्या शिवाय परीक्षेला बसताच येत नाही मग ती लेखी परीक्षा असो किंवा मैदानी चाचणी. तुम्हाला येथे हे प्रवेशपत्र एका क्लिक वर मिळेल. त्या साठी तुम्हाला संबंधित पोस्ट वर जाऊन तुमचा  Registration id व  Password टाईप करायचा आहे.

अभ्यासक्रम

स्पर्धा  परीक्ष्यांचा आवाका अत्यंत विस्तृत आहे. म्हणूनच कमी वेळात नेमका अभ्यासक्रम आणि जास्त सराव झाला पाहिजे. अभ्यासक्रमाचा अभ्यास करणे हे जास्त गुण मिळवण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे. म्हणूनच संबंधित पद आणि त्याचा नेमका अभ्यासक्रम अभ्यासावा जेणेकरून जास्तीत जास्त गुण मिळवता येतील.

mahajobs syllabus
mahajobs question paper

प्रश्नपत्रिका

स्पर्धा परीक्ष्यांचा फक्त अभ्यास करणे महत्वाचे नसून अभ्यास किती झाला आहे त्याचे मूल्यांकन करणे हि तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी सराव प्रश्नपत्रिका महत्वाच्या आहेत तसेच मागील वर्ष्याच्या प्रश्नपत्रिकांचे आकलन करणे अत्यंत महत्वाचे आहे.

पुस्तके

महाराष्ट्र शासनाची तसेच केंद्रीय शासनाची तसेच विविध बोर्डची PDF स्वरूपातील E-बुक्स तुम्ही डाउनलोड करु शकता. हि पुस्तके तुमचे बेसिक पक्के करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत.

mahajobs books

Mahajobs.in

स्वामी विवेकानंद यांच्या या घोषवाक्याची प्रेरणा घेऊन समस्त स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तसेच नव्या दमाने स्पर्धा परिक्षेसाठी सुरवात करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व  विद्यार्थ्यांसाठी भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील सरकारी शासकीय  नोकरी मध्ये असणाऱ्या विविध पदांच्या भरती प्रक्रीया खालील आयोगामार्फत राबविल्या जातात जसे की केद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग(स्टाफ सिलेक्शन कमिशन, सरळ सेवा भरती, पोलिस भरती, तलाठी अशा विविध शासकीय विभागातील पदातील भरतीची संपूर्ण जाहिरात, प्रवेश प्रक्रीया, शैक्षणिक पात्रता, व त्या पदाशी संबंधीत अभ्यासक्रम व अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाचे आवश्यक साहित्य संदर्भ तसेच मागील वर्षीच्या झालेल्या त्या पदांच्या प्रश्नपत्रिका तसेच काही निवडक पदांसाठी विशेष माहिती जसे की पोलिस उपनिरिक्षक तसेच पोलिस भरती या पदांसाठीची शारीरीक चाचणी या बद्दलची संपूर्ण माहिती.
अशा प्रत्येक परिक्षेची रचना त्याची प्रवेश पत्रिका व तसेच विविध पदांचे निकाल या  व अश्या स्पर्धा परिक्षा संबधीत मार्गदर्शन करणारी MAHAJOBS.IN ही वेबसाईट आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहोत याचा आम्हाला आनंद आहे.

This is my offficial youtube channel. for getting latest video please subscribe.

Library near by me