महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाई या पदांसाठी भरती प्रक्रिया दिनांक ३ सप्टेंबर २०१९ रोजी सुरु होत आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाई या पदांसाठी शैक्षणिक पात्रता १२ वी पास आहे तसेच शारीरिक पात्रता मुलांसाठी उंची १६५ सेन्टी मीटर व छाती न फुगवता ७९ ते ८४ व +५ श्वास आतमध्ये घेऊन तसेच मुलींसाठी उंची १५५ सेन्टी मीटर आहे.
प्रथमच महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती हि लेखी परीक्षा सुरवातीला घेण्यात येणार असून त्यानंतर गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. हि लेखी परीक्षा महापरीक्षा पोर्टल मार्फत घेण्यात येत आहे. पात्र असलेल्या उमेदवाराने महापरीक्षा या पोर्टल वर आपले अर्ज सादर करावयाचे आहेत. दिनांक ३ सप्टेंबर २०१९. पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होत आहे उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. जाहिरात नीट काळजीपूर्वक वाचावी तसेच अर्ज लक्ष पूर्वक भरावा.